आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरापासून जवळच असलेल्या अवधान औद्योगिक वसाहतीत दीड ते दोन महिन्यापासून वीजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे उत्पादन मंदावले असून वीजपुरवठा खंडीत झाल्यावर प्रोसेसिंग युनिटमध्ये टाकलेला कच्चा माल खराब होतो. त्यामुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहे. दुसरीकडे वीजेशी सबंधित समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेल्या उर्जा मित्र समितीची बैठक चार महिन्यापासून झालेली नाही. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वारंवार करूनही उपयोग होत नसल्याने उद्योजक आता आंदोलनाच्या तयारीत आहे. अवधान आैद्योगीक वसाहतीला वीजपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजक वेळेवर वीज बिल भरतात. तसेच एमआयडीसी वीज उपकेंद्रात वीजचोरी व गळतीचे प्रमाण कमी असतानाही एमआयडीसीत वारंवार वीजपुरवठा खंडीत होतो.
सिमेंटसह प्लास्टिक, ऑइल कंपन्याना सर्वाधिक नुकसान लहान युनिटला बसतो तीन हजाराचा फटका एकदा वीजपुरवठा खंडीत झाल्यावर लहान युनिटला अडीच ते तीन हजारांचा तर मोठ्या युनिटला त्याच्या दुप्पट फटका बसतो. एमआयडीसीत ऑइल क्रशिंगचे लहान, मोठे १०० युनिट आहे. त्यांना वीजपुरवठा खंडीत होण्याचा सर्वाधिक फटका बसतो. एमआयडीसीतील वीजेच्या समस्या सोडवण्यासाठी ऊर्जा मित्र समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची दरमहा किवा दोन महिन्यातून एकदा बैठक झाली पाहीजे. समितीचे अध्यक्ष वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता असतात. पण गेल्या चार ते पाच महिन्यापासून या समितीची बैठक झालेली नाही.
यापूर्वी एमआयडीसीत केवळ शनिवारी वीज कंपनीतर्फे दुरुस्तीचे काम केले जात होते. त्यामुळे आठवड्यातून एकच दिवस वीजपुरवठा खंडीत होत होता. पण आता कोणतीही पूर्वसूचना न देता वाट्टेल तेव्हा आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे उद्योजकांच्या समस्या वाढल्या आहे. एमआयडीसी वीज उपकेंद्रांतर्गत ८ फिडर आहे. त्यापैकी सुनाकर, निर्मल, वॉटर प्लाँट, डिसान आणि पॉवर या फिडरवर वीजपुरवठा खंडीत हाेण्याचे प्रमाण जास्त आहे. वीजपुरवठा खंडीत होण्याचा सर्वाधिक फटका प्रोसेसिंग युनिटला बसतो. एमआयडीसीत सिमेंट प्रोसेसिंगचे ७५, प्लॅस्टिक मोल्डींगचे ५० तर तेलबिया प्रोसेसिंगचे १०० युनिट आहे. उत्पादन प्रक्रिया सुरु असतांना अचानक वीजपुरवठा खंडीत झाला तर प्रोसेसिंगसाठी टाकलेला कच्चा माल ऑइल आणि सिड्स क्रशिंग उद्योगांना फेकावा लागतो. तसेच पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते. फक्त दहा मिनिटासाठी वीजपुरवठा तक्रार करूनही उपयोग होत नसल्याचा आरोप एमआयडीसीत केवळ शनिवारी दुरुस्तीची कामे केली जात होती. पण आता कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडीत केला जातो. उद्योजक नियमित वीज बिल भरतात. त्यामुळे त्यांना नियमित वीजपुरवठा होणे अपेक्षित आहे. पण होत नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी वारंवार केली पण काहीही उपयोग होत नसल्याचा आरोप लघु उद्योग भारतीचे सचिव वर्धमान सिंगवी यांनी केला आहेेे.
प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, बैठक लवकरच घेणार एमआयडीसीला वीजपुरवठा करणाऱ्या मोजक्याच फिडरवर वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या आहे. काही वेळेस कारखान्यात आलेल्या अडचणींमुळे वीजपुरवठा खंडीत होतो. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. उद्योग मित्र बैठक लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता भीमराव म्हस्के यांनी सांगितले.खंडीत झाला तरी लाखो रुपयांचा फटका बसतो. तसेच अनेकवेळा कमी जास्त दाबाने वीजपुरवठा होतो. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर बंद पडलेली प्रक्रिया पुन्हा सुरू होण्यासाठी चार तास लागतात. काही वेळा कामगारांना बसून मजुरी द्यावी लागते. त्यामुळे या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
यापूर्वी एमआयडीसीत केवळ शनिवारी वीज कंपनीतर्फे दुरुस्तीचे काम केले जात होते. त्यामुळे आठवड्यातून एकच दिवस वीजपुरवठा खंडीत होत होता. पण आता कोणतीही पूर्वसूचना न देता वाट्टेल तेव्हा आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे उद्योजकांच्या समस्या वाढल्या आहे. एमआयडीसी वीज उपकेंद्रांतर्गत ८ फिडर आहे. त्यापैकी सुनाकर, निर्मल, वॉटर प्लाँट, डिसान आणि पॉवर या फिडरवर वीजपुरवठा खंडीत हाेण्याचे प्रमाण जास्त आहे. वीजपुरवठा खंडीत होण्याचा सर्वाधिक फटका प्रोसेसिंग युनिटला बसतो. एमआयडीसीत सिमेंट प्रोसेसिंगचे ७५, प्लॅस्टिक मोल्डींगचे ५० तर तेलबिया प्रोसेसिंगचे १०० युनिट आहे. उत्पादन प्रक्रिया सुरु असतांना अचानक वीजपुरवठा खंडीत झाला तर प्रोसेसिंगसाठी टाकलेला कच्चा माल ऑइल आणि सिड्स क्रशिंग उद्योगांना फेकावा लागतो. तसेच पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते. फक्त दहा मिनिटासाठी वीजपुरवठा वीज गेल्यावर चार तास मशिन पडते बंद ऑइल मिलमध्ये प्रोसेसिंग सुरु असतांना अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यावर चार तास मशिन बंद ठेवावे लागते. मशिनमध्ये अडकलेला कच्चा माल फेकावा लागतो. वीज कंपनीने या विषयाकडे लक्ष द्यावे. योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष, ऑइल सिड्स क्रशर्स असोसिएशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.