आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:रस्त्यासाठी व्यावसायिकांनी स्वत:च काढले अतिक्रमण

कापडणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कापडणे-देवभाने रस्त्याचे काम सुरू झाले आहे. गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी व्यावसायिकांनी स्वतः अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे देवभाने रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

कापडणे ते देवभाने रस्त्याचे काम आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नातून होते आहे. या कामावर सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च होतील. रस्त्याचे कापडणे गावाच्या बाहेर असलेल्या बोरसे महाविद्यालयापासून मुंबई-आग्रा महामार्गापर्यंत डांबरीकरण पूर्ण झाले. त्यानंतर बोरसे शाळेपासून धनूर रस्त्यावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाला आता प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी बोरसे महाविद्यालयापासून भवानी चौकापर्यंत रस्त्याच्या दोन बाजूला गटारीचे काम सुरू झाले आहे.

या कामाला काही ठिकाणी व्यावसायिक तर काही ठिकाणी निवासी घरमालकांनी केलेल्या अतिक्रमणाचा फटका बसणार हाेता. त्यातून काही दिवसांपासून वाद सुरू हाेते. पण ग्रामपंचायत व गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आले. त्यानंतर भवानी चौकातील व्यावसायिकांनी अतिक्रमण काढून घेतले. त्यामुळे रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. भवानी चौकात होणारी वाहतूक कोंडी आगामी काळात होणार नाही. या रस्त्याचे काम झाल्यावर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांची दळणवळणाची चांगली सोय होणार आहे.

गावातील भवानी चौकापासून बोरसे महाविद्यालयापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडुलिंब, चिंचेची डेरेदार झाडे आहे. काही ग्रामस्थांनी झाडे काढण्यात यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे काढण्यास नकार दिला आहे. झाडे काढण्याची परवानगी शिंदखेडा वनविभागाकडून ग्रामपंचायतीने घ्यावी. परवानगी मिळाली तरच वृक्ष तोडले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. रस्त्यावरील वृक्ष तोडावी, अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांच्याकडे काही ग्रामस्थांनी केली आहे.

रस्त्याच्या मधोमध असलेले वृक्ष तोडण्यासाठी पत्रव्यवहार
रस्त्याच्या मध्यभागी येणारी झाडे काढण्यात यावी अशी मागणी हाेतेे आहे. याबाबत शिंदखेडा वनविभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे. रस्त्यावरील झाडे व वीज वितरण कंपनीचे पोल काढले तर फायदा होईल. ग्रामपंचायतीतर्फे नवीन झाडे लावण्यात येतील. सोनीबाई भील, सरपंच, कापडणे

बातम्या आणखी आहेत...