आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकांच्या १६ हजार जागा रिक्त आहेत. या जागांवर असलेल्या सहायक प्राध्यापकांची तासिका तत्त्वावर नियुक्ती झाली आहे. त्यांना कायम करावे यासह समान काम-समान वेतन मिळावे, विनाअनुदानित महाविद्यालयात कायमस्वरूपी पूर्णवेळ सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करावी आदी मागण्यांसाठी सेट-नेट, पीएचडी धारक संघर्ष समितीतर्फे परीक्षा काळात बेमुदत कामबंद आंदोलन होणार आहे. त्यात सावित्रीबाई फुले व बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह अन्य विद्यापीठाच्या क्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयातील १५ ते १६ हजार प्राध्यापक सहभागी होतील.
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासह केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाविद्यालयात प्राध्यापकांची १०० टक्के भरती होणे आवश्यक आहे. याविषयाकडे नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीतर्फे वेधले जाते आहे. पण शासनाने त्याचे गांभीर्याने दखल घेतलेली नाही. उलट चुकीचे निर्णय तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांवर लादले जात आहे. प्राध्यापक भरतीसाठी सर्व अटीची पूर्तता करून दाखल केलेल्या प्रस्तावांना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन वाढवले नाही. त्यामुळे याविषयाकडे लक्ष वेधण्यासह प्राध्यापकांची भरती करावी या मागणीसाठी पुणे येथील बैठकीत काम बंद आंदोलनाचा निर्णय झाला. हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत करण्याचा इशारा दिला आहे.
तीन वर्षांपासून भरती थांबलेली
भरती प्रक्रियेला होणारा विलंब व चुकीच्या शासन निर्णयामुळे पात्रताधारक प्राध्यापकांची चिंता वाढली आहे. तीन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडली असून, ती करावी. सर्व रिक्त जागा भरण्याची मागणी आहे. प्रा. प्रदीप पाटील, राज्य समन्वयक,सेट-नेट, पीएचडी धारक संघर्ष समिती
माने समितीच्या शिफारशींना नकार
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी माने समिती गठीत झाली होती. समितीने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना परीक्षेची कामे द्यावी, असे सुचवले होते. पण ही शिफारश शासनाने नाकारली. दुसरीकडे शासन अनधिकृतरीत्या या निर्णयाचे उल्लंघन करून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना परीक्षेची कामे सोपवत असल्याचा आरोप करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.