आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक संघटना:पुरोगामी शिक्षक संघटना लावणार काळ्या फिती

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या विरोधात चालवलेल्या बदनामीकारक मोहिमेचा निषेध करण्यासाठी शिक्षकदिनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी होणार आहे.

पुरोगामी शिक्षक संघटनेची नुकतीच विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, विभागीय सचिव रवींद्र देवरे, ग.स. बँकेचे माजी संचालक रवींद्र सैंदाणे, किरण चौधरी, गोकूळ पाटील, बाबा बढे, राकेश जाधव, संजय अमृतकर, मुरलीधर नानकर, गिरीधर देवरे, मीरा देवरे यांनी संघटनेत प्रवेश केला. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

बैठकीच्या यशस्वितेसाठी संघटक कमलेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष कैलास सोनवणे, जिल्हा संघटक खुशाल चित्ते, तालुकाध्यक्ष हनुमानदास बैरागी, तालुका सरचिटणीस डॉ. भागवत चौधरी, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, सचिव ललित वाघ, कार्याध्यक्ष डॉ. आशुतोष वसईकर, महिला मंचच्या कोषाध्यक्ष रंजना राठोड, उपाध्यक्षा हिरा अहिरे आदींनी प्रयत्न केले. सरचिटणीस ऋषिकेश कापडे यांनी सूत्रसंचालन केले. कोषाध्यक्ष न्हानू माळी यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष प्रशांत महाले यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...