आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राज्य सरकारच्या धोरणांमुळे प्रकल्प गुजरात राज्यात‎

शिंदखेडा‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात येणारे नवीन उद्योग‎ शिंदे-फडणवीस सरकारच्या‎ चुकीच्या धोरणामुळे अन्य राज्यात‎ जात आहे. त्यामुळे शासनाच्या या‎ धोरणाचा निषेध करण्यासाठी‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तहसील‎ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात‎ आले. आंदोलनात सहभागी‎ झालेल्यांनी शासनाच्या निषेधाचे‎ फलक हातात धरले हाेते.‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा‎ कार्याध्यक्ष निखिल पाटील यांच्या‎ नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

या‎ वेळी शिंदे व फडणवीस सरकारच्या ‎विरोधात जोरदार घोषणाबाजी‎ करण्यात आली. महाराष्ट्राचे‎ नुकसान करून गुजरात राज्याचे‎ हित जोपासणारे शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्र द्रोही असल्याचा आरोप ‎करण्यात आला. महाराष्ट्रातील‎ उद्योग धंदे व महत्त्वाच्या संस्था ‎गुजरातला नेल्या जात आहे.‎ महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा‎ प्रयत्न होतो आहे. शिंदे-फडणवीस‎ सरकार गुजरातचे एजंट होऊन एका‎ पाठोपाठ एक उद्योग गुजरातला‎ पाठवत आहे. एकदिवस हे सरकार‎ मुंबईसारख्या आर्थिक राजधानीला‎ सुद्धा गुजरातला देऊन टाकतील की‎ काय? हा प्रश्न या वेळी उपस्थित‎ करण्यात आला. देशातील विकसित‎ राज्यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे‎ राज्य असल्याने देशाचे पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प आणि संस्था‎ गुजरातला हलवण्याचा सपाटा‎ लावला आहे.

महाविकास आघाडी‎ सरकारच्या काळात गुजरातला‎ प्रकल्प जात नव्हते.‎ शिंदे-फडणवीस सरकारच्या‎ कार्यकाळात वेदांत फाॅक्स्कॉन,‎ बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस हे‎ मोठे प्रकल्प गुजरातला गेले.‎ महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला‎ गेल्यामुळे राज्य सरकारने‎ महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी‎ मागावी, अशी मागणी आंदोलनाद्वारे‎ करण्यात आली. आंदोलनात‎ राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलचे‎ जिल्हाध्यक्ष दीपक जगताप,‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष‎ प्रवीण पाटील, आनंदराव पाटील,‎ ईश्वर माळी, अॅड. नीलेश देसले,‎ हिमांशु पाटील, धनराज पाटील‎ आदी सहभागी झाले.‎

बातम्या आणखी आहेत...