आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कांद्याची रोपे सडल्याने लागवड लांबणीवर; शेतकरी पुन्हा देताय कांदा बियाणे टाकण्यावर भर

तऱ्हाडी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने कांदा रोपे जमिनीत सडल्याने शिरपूर तालुक्यात कांदा लागवडीला ब्रेक मिळाला आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा कांदा बियाणे टाकण्यावर भर देत असून, कांदा लागवडीला उशीर होणार आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी लाल कांदा लागवडी करत असतात. पण कांदा रोपे नसल्याने मजुरांनाही पुढे येणाऱ्या ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे, ज्या शेतकऱ्यांनी उंच-सखल भागावर बियाणे टाकलेले आहे अशा मोजक्याच शेतकऱ्यांचे कांदा रोपे वाचल्याने त्याच शेतकऱ्यांची लाल कांदा लागवड होणार आहे.

गेली दहा, बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने लाल कांदा बियाणे टाकत आहे. पण पुन्हा हवामान तज्ज्ञांनी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने बियाणे ही येतात की नाही त्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मात्र कांदा लागवडीसाठी आतुर झालेला असतानाही कांदा रोपांअभावी शेती मात्र पडीक राहिली आहे. यावर्षी मात्र निसर्गाच्या लहरीपणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्यातून शेतकऱ्यांचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने तसेच पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे लाल कांदा रोपे, बियाणे जमिनीतच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांच्या कांदा लागवडी खोळंबल्याने शेतकरी विवंचनेत पडला आहे. कांदा लागवडीसाठी दीड एकर क्षेत्र ठेवले होते पण पावसाने मात्र रोपे खराब झाल्याने थोड्या प्रमाणात कांदा लागवड होणार असून, रोपांअभावी काही क्षेत्र मात्र पडीक राहणार आहे, असे कांदा उत्पादक शेतकरी शरद सोनवणे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...