आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिका दिन विशेष:शहरात जीएनएम नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव; हिरे रुग्णालयात 375 परिचारिका, 117 पदे रिक्तमुळे कामाचा ताण

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकट काळात व इतर वेळीही जीवाची पर्वा न करता अविरत रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यानंतरही परिचारिका रुग्णसेवा देण्यात मागे नाही. एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे शहरात जीएनएम नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पण सन २०२३ पासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे निदान भविष्यात परिचारिकांवरील कामाचा ताण कमी होऊ शकतो.

कोणत्याही रुग्णालयात डॉक्टराप्रमाणे परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. परिचारीकांचा सेवाभाव कोरोना काळात प्रकर्षाने जाणवला. पण परिचारीकांचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यापैकी महत्त्वाची समस्या म्हणजे अपूर्ण मनुष्यबळ ही आहे. सद्य:स्थितीत हिरे रुग्णालयात सुमारे ३७५ परिचारिका असून ११७ पदे रिक्त आहे. जिल्हा रुग्णालय व त्यातंर्गत असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये १९५ परिचारिका कार्यरत आहे. तेथेही अनेक पद रिक्त आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नव्याने जीएनएम नर्सिंग कॉलेज सुरू होणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडियाला पाठवला आहे. सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या एएनएम कॉलेजच्या जागा २० वरुन ४० कराव्या अशी विनंती केली आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजूरी मिळाली नसली तरी या वर्षाअखेरपर्यत ती मिळेल. त्यानंतर जून २०२३ पासून जीएनएमसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकते. एएनएम प्रमाणेच जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जीएनएम कॉलेज सुरू होऊ शकेल.

ब्रेन अॅण्ड हार्ट
रुग्णसेवा देताना डॉक्टर-परिचारिकांमधील समन्वय महत्त्वाचा असतो. औषध देणारे डॉक्टर ब्रेन असतील तर प्रत्यक्षात कार्य करणाऱ्या परिचारिका या हार्ट आहे. त्यामुळे डॉक्टरांपेक्षा परिचारिकांचा रुग्णांशी जवळचा संबंध येतो.

समन्वयातून उत्तम सेवा
जीएनएम नर्सिंग कॉलेजविषयी प्रस्ताव पाठवला आहे. पुढील वर्षी सन २०२३ मध्ये हा अभ्यासक्रम सुरू होऊ शकेल. कोराेनानंतर रुग्ण शुश्रूषा क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यात तरुणही आहे. डॉक्टर-परिचारिकांच्या समन्वयातून चांगली रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न होतो आहे.
डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक

बातम्या आणखी आहेत...