आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:बालिकांवरील अत्याचाराचा निषेध; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

धुळे‎ शहरातील देवपूर व धरणगाव येथे‎ बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा‎ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध‎ करण्यात आला. तसेच‎ जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर‎ निदर्शने करण्यात आली. दोषींना‎ कठोर शासन करावे, अशी मागणी‎ करण्यात आली. याविषयी‎ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात‎ आले.‎ या प्रकरणातील दोषींवर पोस्को‎ कायद्यांतर्गत कारवाई करावी, हा‎ खटला जलदगती न्यायालयात‎ चालवावा, आरोपींना कठोर शिक्षा‎ व्हावी, पीडितांना खटला‎ चालविण्यासाठी विधी सेवा‎ प्राधीकरणाद्वारे मोफत वकील द्यावा,‎ मनोधैर्य योजनेचा लाभ द्यावा अशी‎ मागणी करण्यात आली.‎

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ जिल्हाध्यक्ष रणजित भोसले,‎ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे‎ जिल्हाध्यक्ष गोपीचंद कोळी,‎ कार्याध्यक्ष विश्वजित देसले,‎ विभागीय उपाध्यक्ष भावेश भदाणे,‎ शुभम भदाणे, प्रणव भोसले, माेनेश‎ पाटील, कल्पेश मगर, प्रसाद महाले,‎ स्वमिनी पारखे, चारूशिला बेडसे,‎ साक्षी परदेशी आदी सहभागी झाले.‎ या वेळी राष्ट्रवादी काँग्रसतर्फे‎ घोषणाबाजी झाली.‎

बातम्या आणखी आहेत...