आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निदर्शने:तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे महागाईविरोधात आंदोलन

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने तळोदा शहरातील स्मारक चौकात निदर्शने केली. ५० खोके महंगाई एकदम ओकेच्या घोषणेने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादीकडून या मजकुराचे टीशर्ट देखिल वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या आदेशान्वये हे निदर्शने करण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात तळोदा शहरातील स्मारक चौकात झालेल्या निदर्शनात कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी, युवक शहर उपाध्यक्ष देवेश मगरे, शहराध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, युवा नेते संदीप परदेशी, शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, नदीम बागवान, खजिनदार धर्मराज पवार, अल्संख्यांक शहर अध्यक्ष आदिल शेख, संघटक राहुल पाडवी, सहसंघटक मुकेश पाडवी, युवक तालुका उपाध्यक्ष दीपक वळवी, युवक तालुका उपाध्यक्ष संदीप वळवी, युवा कार्यकर्ता कुणाल पाडवी, मच्छिंद्र पाडवी, नीलेश मराठे, हितेश राणे, नितीन मिस्त्री, असिफ शेख, हर्षल सूर्यवंशी, मन्नू मणियार, प्रकाश पाडवी, सागर पाडवी, अरुण पाडवी, हिमांशू माळी, पवन सागर, भुऱ्या चित्ते, कुशन वळवी, रमेश पाडवी, रवींद्र वळवी, विश्वनाथ वळवी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...