आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:लाकडाची मोडी देऊन दरवाढीचा निषेध ; तळोदा, नवापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून महामागाईबाबत संताप

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढणाऱ्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशान्वये तळोदा येथील स्मारक चौकात तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. आंदोलनात गॅसदरवाढीचा निषेध म्हणून चुलीवर चहा बनवला. तर महिलांनी चूल सोबत लाकडाची मोळी वाटप करत महागाई विरोधात ढोल व झांजर वाजवून गाणे गात आंदोलन करून साऱ्यांचे लक्ष वेधले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते संदीप परदेशी, पालिकेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अनिता परदेशी, तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपूत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश मराठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, डॉ.रामराव आघाडे, केसरसिंग क्षत्रिय, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष शेख आरिफ शेख नुरा, शहराध्यक्ष शेख आदिल शेख दिलावर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कमलेश पाडवी, उपाध्यक्ष दीपक वळवी, संदीप वळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश पाडवी, उपाध्यक्ष देवेश मगरे, हितेश चोधरी, आदित्य इंगळे, जिल्हा सरचिटणीस याकूब, शहर संघटक राहुल पाडवी, सह संघटक नासीर शेख, नदीम बागवान, गणेश पाडवी, अनिल पवार, माजी नगरसेविका सुनंदा गणेश पाडवी, पूनम मराठे, गायत्री क्षत्रिय, धर्मराज पवार, फराज पठाण, सुदाम मोरे, विकास खाटीक, जयेश जोहरी, इम्रान शिकलीकर, साबीर मिस्त्री, नितीन मराठे, प्रकाश पाडवी, सागर खैरनार उपस्थित होते.

नवापूर गेल्या काही दिवसांपासून महागाई उच्चांक गाठत असून, यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असताना नवापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महागाई विरोधात आंदोलन केले. सध्या इंधन, गॅस, तेल व भाजीपाला यांचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई वाढल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षातर्फे गॅस व दुचाकी वाहन ठेवून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांच्या सूचनेनुसार शनिवारी महागाईच्या विरोधात निषेध मोर्चा व आंदोलन करण्यात आले. शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गॅस व दुचाकी वाहनांना पुष्पहार चढवून मोदी सरकारचा निषेध केला. महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडले आहे. जनता हैराण झाली आहे. केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठी वापरला जाणाऱ्या एलपीजी गॅसचे दर वाढवले होते. त्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा महिला गॅसकडून चुलीकडे वळल्याचे चित्र आहे. महागाईच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत असल्याचे अॅड.मोरे म्हणाले. यावेळी न.पा. विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे, चर्मकार समाज अध्यक्ष छोटू अहिरे, जिल्हा सरचिटणीस सनी सावरे, गोलू राजपूत, मयूर सावरे, विकी महाले, अजय जाधव, अविनाश जाधव, अर्जुन सावरे, हेमंत नगराळे, मिलिंद बागले, रेहान खाटीक, अली खाटीक, शाहरुक खाटीक, सलामन बागवान, समीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...