आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थान राज्यातील कन्हैयालाल व अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी येथे रविवारी सकाळी १० वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू बांधवांचा मूक मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात दोंडाईचा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून झाली. प्रास्ताविकात विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा यांनी मोर्चाचे उद्दिष्ट सांगितले. या मूक मोर्चात ज्येष्ठ नेते डॉ.कांतिलाल टाटिया, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील, सरचिटणीस जितेंद्र जमदाळे, शहराध्यक्ष विनोद जैन, उपाध्यक्ष पंकज सोनार, दिनेश खंडेलवाल, दिनेश नेरपगार, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, नागरी हित संघर्ष समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी, तैलिक समाजाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.योगेश चौधरी, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, जयवंत मोरे, बजरंग दलाचे राजा साळी, विठ्ठल बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, डॉ.वसंत अशोक पाटील, डॉ.हेमंत सोनी, राजपूत समाज मंडळाचे कार्याध्यक्ष कोमलसिंग गिरासे, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, संजय चौधरी, मुनेश जगदेव, भुरा पवार, गुरुचरण राजपाल, रमाशंकर माळी आदी सहभागी झाले होते.मोर्चात सहभागी हिंदू बांधवांनी निषेध म्हणून काळे रिबन बांधले होते. हातात भगवे झेंडे व मागण्यांचे फलक घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आ ला. त्यात हजाराे हिंदू बांधव सहभागी झाले. तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.