आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बंडाचा निषेध; शिरपुरात आंदोलन

शिरपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोर एकनाथ शिंदे व इतर बंडखोर आमदारांच्या विरोधात शनिवारी शिरपूर तालुका शिवसेना, युवासेनेकडून तीव्र निषेध करण्यात आला व उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. शिवसेना हा पक्ष नसून हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला एक विचार आहे. कोणत्याही परिस्थितीत मग सत्ता असो या नसो आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. यासाठी शिरपूर तालुक्यातील आजी-माजी शिवसेना, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन केले.

यावेळी उपजिल्हा प्रमुख भरत राजपूत, उपजिल्हा संघटक विभाभाई जोगराणा, माजी जिल्हाप्रमुख हिंमतसिंग महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटूसिंग राजपूत, तालुकाप्रमुख दीपक चोरमले, अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, समन्वयक देवेंद्र पाटील, संघटक प्रेम कुमार चौधरी, उपतालुका प्रमुख अभय भदाणे, मंगलसिंग भोई, सुकलाल पावरा, सुनील मालचे, स्वरूपसिंग पावरा, उपशहर प्रमुख बंटी लांडगे, योगेश ठाकरे, इंद्रिस शहा, रेहान, वाजिद मलक, माजी तालुका संघटक मुकेश शेवाळे, पिंटू शिंदे, रवींद्र जाधव, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी तालुकाधिकारी विजय पावरा, उपतालुकाधिकारी जितेंद्र राठोड, राहुल पावरा, जगदीश पावरा, बबलू शेख, दिनेश गुरव, मंगल पावरा, युवासेना सचिव सचिन शिरसाठ, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी शिवसेना संपर्क कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले.