आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन फक्त एप्रिल फूल; राष्ट्रवादी युवक काँग्रेस, काँग्रेसतर्फे शहरात आंदोलन
सिलिंडरला हार घालून इंधन दरवाढीचा केला निषेध
चुकीच्या धोरणामुळे जगणे झाले कठीण : काँग्रेस
गॅस सिलिंडर व दुचाकीला आडवे पाडून पुष्पहार अर्पण करत इंधन दरवाढीचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. शहरातील श्रीराम पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन करण्यात आले. खोटे आश्वासन व स्वप्न दाखवत भाजपने सत्ता मिळवल्याचा आरोप करण्यात आला. महागाई, दरवाढीमुळे नागरिकांचे जगणे मुश्किल झाले असल्याचा आरोप या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी केला. आंदोलनात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. शरद पाटील, युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके, डॉ. दरबारसिंग गिरासे, शहर कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, ष प्रमोद सिसोदे, भगवान गर्दे, पंकज चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, बानूबाई शिरसाठ, भिवसन अहिरे, जावेद शेख, भटू महाले, प्रल्हाद मराठे, आनंद जावळेकर आदी सहभागी झाले होते.
धुळे | पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अच्छे दिनचे आश्वासन दाखवून सत्ता मिळवली. सत्ता मिळाल्यावर त्यांना सर्व आश्वासनांचा विसर पडला. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व काँग्रेसतर्फे एप्रिल फूलचे औचित्य साधून वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच केक कापून एप्रिल फूल साजरा करण्यात आला. इंधन दरवाढी विरोधात मोपेड आणि गॅस सिलिंडरला पुष्पहार अर्पण केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व काँग्रेसकडून एकाच ठिकाणी करण्यात आलेल्या आंदोलनामुळे नागरिकांचे लक्ष आंदोलनाकडे वेधले गेले. या वेळी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. साक्रीत महागाई मुक्त भारत आंदोलनातून विरोध
साक्री | येथील तहसील कार्यालयाच्या समोर काँग्रेसतर्फे महागाईविरोधात महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी खासदार बापूसाहेब चौरे, काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष उत्तमराव देसले, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, पंचायत समितीचे गटनेते शांताराम पवार, काँग्रेसचे सरचिटणीस गणेश गावित, पंकज सूर्यवंशी, सचिव उदय सूर्यवंशी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष अविनाश शिंदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रणजित गवळी, काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, सरपंच युवराज चौरे, याकुब पठाण, नदीम पठाण दिनेश बोरसे, किशोर पाटील, कमलाकर मोहिते आदी सहभागी झाले. या वेळी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शासनाने इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केकही कापला
पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ झाली आहे. वारंवार आश्वासन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचे स्वप्न एप्रिल फूलच असल्याने शुक्रवारी एक एप्रिलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपावर केक कापून महागाई, इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनातंर्गत पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना साखर वाटून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, प्रदेश सचिव सुमित पवार, जिल्हाध्यक्ष कुणाल पवार, कुणाल चव्हाण, निखिल मुमया, एजाज शेख, दानिश पिंजारी, मयुर देवरे, अमीन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.