आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:वाढीव घरपट्टीच्या विरोधात निदर्शने‎

शिरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील नगरपालिकेने घरपट्टीत वाढ‎ केली आहे. त्याविरोधात राष्ट्रवादी‎ युवक काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष‎ मनोज महाजन यांच्या‎ नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात‎ आले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी‎ नेरकर यांना निवेदन देण्यात आले.‎ घरपट्टी कमी करावी, अशी मागणी‎ करण्यात आली.‎ नगरपालिकेने शहरातील‎ मालमत्ता धारकांना २७ टक्के‎ करवाढीची नोटीस बजावली आहे.‎

नोटबंदी, जीएसटी, कोविड‎ महामारी व अतिवृष्टीमुळे शिरपूर‎ शहरातील सर्वसामान्य नागरिक,‎ व्यापारी, शेतकरी, शेतमजूर व‎ कामगारांची आर्थिक स्थिती खराब‎ झाली आहे. त्यांना अनेक समस्यांना‎ तोंड द्यावे लागते आहे. या कठीण‎ काळात घरपट्टीत वाढ करणे‎ चुकीचे आहे. शिरपूर-वरवाडे‎ नगरपरिषदेची १०० टक्के घरपट्टी व‎ पाणीपट्टी वसूल होते. त्यानंतरही‎ करवाढ करणे चुकीचे आहे.‎

दोंडाईचा, शहादा, चोपडा‎ नगरपरिषदेने यंदा कुठलीही‎ करवाढ केलेली नाही. त्यामुळे‎ शिरपूर नगरपालिकेने करवाढ करू‎ नये अशी मागणी आंदोलनाद्वारे‎ करण्यात आली. या वेळी चुकीच्या‎ धोरणाविरोधात घोषणाबाजी‎ करण्यात आली. आंदोलनात‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश‎ करनकाळ, डॉ. मनोज महाजन,‎ राष्ट्रवादीचे प्रवक्ते हेमराज राजपूत,‎ सय्यद अशपाक, युवराज पाटील,‎ अॅड. करनकाळ, भुषण पाटील,‎ परेश शिंपी, पूनमचंद पाटील,‎ राहुल कोळी आदींसह पदाधिकारी‎ सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...