आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा पुरवा:एकवीरादेवीच्या यात्रेचे सूक्ष्म नियोजन करत सुविधा पुरवा

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री एकवीरादेवीचा चैत्र यात्रौत्सवाला १५ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर प्रदीप कर्पे, आयुक्त देविदास टेकाळे यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह मंदिर परिसराची पाहणी केली. यात्रेसाठी सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशी सूचना महापौर प्रदीप कर्पे यांनी दिली. दोन वर्षांपासून कोरोनामुळे एकवीरादेवीची यात्रा झालेली नाही. निर्बंध हटवल्याने यंदा यात्रा होणार आहे. यात्रेला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यात्रा शांततेत व्हावी या उद्देशाने महापौर प्रदीप कर्पे यांनी पदाधिकारी, अधिकाऱ्यांसह मंदिर परिसराची पाहणी केली. व्यावसायिकांना जागा ठरवून देणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, दैनंदिन साफसफाई, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय मदत, सार्वजनिक मदत केंद्र आदी सुविधा पुरवाव्या अशी सूचना महापौर प्रदीप कर्पे यांनी केली.

यात्रेचा सूक्ष्म आराखडा करावा, असेही ते म्हणाले. स्थायी समिती सभापती शीतल नवले, नगरसेवक हिरामण गवळी, अमोल मासुळे, सुनील बैसाणे, अरुण पवार, दिनेश बागुल, पोलिस उपनिरीक्षक निकम, अभियंता कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...