आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामंडळ:कॅशलेससाठी प्रत्येक बस वाहकाकडे क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा ; शिंदखेडा ग्राहक पंचायतीने एसटी महामंडळाकडे केली मागणी

शिंदखेडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅशलेस व्यवहारासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेडाने केली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी शिंदखेडा आगारप्रमुख नीलेश गावित यांना दिले. वरिष्ठ स्तरावर ही मागणी पोहोचवून कॅशलेस व्यवहाराची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. सध्याचे जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वत्र केला जातो. कॅशलेस व्यवहार सध्या प्रचलित झाला आहे. केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार करण्याबाबत आग्रह धरला आहे. त्याला अनुसरूनच अगदी चणे फुटाणे विक्रेत्यांपासून मोठे दुकानदार आणि व्यावसायिकांपर्यंत क्यूआर कोडचा वापर केला जात आहे. याला अपवाद मात्र एसटी महामंडळ ठरले आहे. अद्यापही एसटी महामंडळात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. परिणामी अनेक प्रवाशांकडे लागणाऱ्या भाड्यासाठी संबंधित रक्कम, सुट्या पैशांच्या स्वरूपात उपलब्ध नसते आणि तीच तीच बाब वाहकाबाबतीत घडते‌. सुटे पैसे देण्या-घेण्यावरून अनेक वेळेला वाद होतात. हे वाद होऊन मारामारी होते. त्यामुळे क्यूआर कोड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे. या वेळी पंचायतीचे जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा तालुकाप्रमुख प्रदीप दीक्षित, सचिव गजानन शास्त्री, संघटक प्रा. योगेंद्र सनेर, सहसंघटक प्रा.अजय बोरदे, सदस्य रवींद्र ठाकूर, भीमराव कढरे, भय्या मंगळे, जितेंद्र मेखे, नलिनी वेताळे, अॅड. वसंतराव भामरे, संजय पारख अशोक राखेचा, मनोज वारुडे, छायाताई पवार, विजयाताई भावसार उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...