आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद शाळांची दरमहा केंद्रस्तरीय मासिक शिक्षण परिषद होते. या परिषदेची वेळ सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार असते. परिषदेच्या दिवशी शाळा सकाळच्या सत्रात भरवावी लागते. सकाळची शाळा झाल्यावर शिक्षकांना शिक्षण परिषदेला हजर राहावे लागते. त्यामुळे शिक्षण परिषदेच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे.
शिक्षण परिषदेमुळे दिवसभर शिक्षकांची धावपळ होते. विशेषतः महिला शिक्षिकांची गैरसाेय होते. त्यामुळे याविषयी विचार करावा, अशी मागणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. मंजूषा क्षीरसागर यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी प्राचार्य क्षीरसागर यांनी शिक्षण परिषदेच्या वेळेत बदल करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता प्रा. शिवाजी ठाकूर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, जिल्हा संघटक खुशाल चित्ते आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.