आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Dhule
  • Provides Information On Various Welfare Schemes Implemented By The Government In The Last Two Years; Awareness Of Special Component Schemes From Art Teams|marathi News

दिव्य मराठी विशेष:शासनाने दोन वर्षांत राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांची देताय माहिती; विशेष घटक योजनांची कला पथकांतून जागृती

धुळे6 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विशेष घटक योजनेच्या माध्यमातून सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या सहकार्याने जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातर्फे धुळे जिल्ह्यात जनजागृतीपर प्रसिद्धी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लोककला पथकांच्या माध्यमातून गावागावांमध्ये समाजकल्याण विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या शासनाने गेल्या दोन वर्षांत राबवण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती या पथकांतर्फे ग्रामस्थांना देण्यात येत आहे. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात श्री चिराई देवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अर्थे, महात्मा फुले कृषक मंडळ व बहुउद्देशीय संस्था तऱ्हाडी, श्रमिक बहुउद्देशीय सेवा संस्थेचे नटराज कलापथक, श्री सद‌्गुरू सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्थेच्या पथकाने समाजकल्याण विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, कन्यादान योजना, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मॅट्रिकपूर्व शिक्षण फी, परीक्षा प्रदान योजना, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, नववी व दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, रमाई आवास योजना, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना, दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व बौद्ध जातीतील बचत गटांना अनुदानावर ट्रॅक्टर व अवजारे योजना, अनुसूचित जमातीतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची माहिती देण्यात येत आहे. याशिवाय कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...