आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापती न्यायदानाच्या कामात व्यग्र असताना धुळे जिल्हा पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून त्यांच्या पत्नीही कार्यरत आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिस उपनिरीक्षक रोहिणी जाधव यांनी मध्यरात्री देवपूर परिसरात दीड वर्षाच्या मुलगी मीरासह बंदोबस्त देत कर्तव्य निभावले. तसेच मातृत्वाची जबाबदारी पार पाडली. उपनिरीक्षक जाधव मध्यरात्री १२ ते गुरुवारी पहाटे पाचपर्यंत बंदोबस्तावर होत्या.
देवपूर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रोहिणी जाधव यांनी तपास कामामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे पती मिलिंद निकम न्यायाधीश असून तुळजापूर येथे कामात व्यग्र असतात. या दाम्पत्याला दीड वर्षाची मुलगी मीरा आहे. दिवसभर नातलग अन् देखभाल करणाऱ्या महिलेकडे मीरा रमते; परंतु इतर बालकांप्रमाणेच रात्रीच्या वेळी मात्र तिला आईच हवी असते. मातृत्वाची जबाबदारी पार पडण्यात रोहिणी जाधव मागे राहिल्या नाही. अशातच बुधवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशनचा आदेश आला. वरिष्ठांच्या आदेशानुसार रोहणी जाधवही कर्तव्यावर निघाल्या; परंतु दीड वर्षाची मीरा त्यांना सोडण्यात तयार नव्हती. त्यामुळे अखेर मीराला घेऊन रोहिणी जाधव यांनी दत्त मंदिर चौकात सहकाऱ्यांसह शासकीय कर्तव्य बजावले. या वेळी वाहनाची तपासणी त्यांनी केली. या वेळी मीरा मात्र आईच्या कुशीत होती.
कर्तत्व, मातृत्व श्रेष्ठच
शासन आणि वरिष्ठांनी विश्वासाने सोपवलेली जबाबदारी पार पाडणे कर्तव्य आहे. दुसरीकडे आईचे कर्तव्य पार पाडणे तेवढेच गंभीर आहे. रात्रीच्या वेळी मीरा कोणाकडेच राहत नव्हती. त्यामुळे तिला घेऊन बंदोबस्त दिला. वाहनांची तपासणी केली. माझ्यासाठी शासकीय कर्तव्य अन् मातृत्व दोघेही श्रेष्ठ आहे.
रोहिणी जाधव, पोलिस उपनिरीक्षक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.