आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा सेवा संघ प्रणित संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धुळे तालुक्यातील लळींग दिवाणमळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सद्गुणांचा अंकुर आतून उमलताना याविषयावर मानसशास्त्रीय कार्यशाळा झाली. संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. वैशाली पाटील म्हणाल्या की, क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांनी शून्यातून वटवृक्ष उभा केला.
दुसऱ्या व्यक्तींमधील चांगले गुण शोधण्याची सवय असली पाहीजे. कारण या सवयीमुळे आयुष्यातील नकारात्मक व दुसऱ्याचा द्वेष करण्याची भावना कमी होते. माझ्यात अवगुण आहे ही भावना व्यक्तीला आयुष्यात नम्र व क्षमाशील राहायला शिकवते, असेही त्या म्हणाल्या. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून गीत सादर केले.
आदर्श पालकांचा प्रबोधन परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत प्रथम क्रमांक समृद्धी गवळी, द्वितीय श्रद्धा हिरणवळे, तृतीय सोहम गवळी यांनी मिळवला. आशा पाटील यांनी सूत्रसंचालन केले, शारदा पाटील, यामिनी खैरनार, अर्चना पाटील, शीतल पाटील, मुरलीधर शिंदे, राजेंद्र भामरे, जयश्री घरटे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती संत गाडगे महाराज प्रबोधन परिषदेतर्फे देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.