आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर घर तिरंगा व एचआयव्हीवर जनजागृतीसाठी रॅली:शिरपूरला स्वच्छता अभियानासह एचआयव्ही विरोधात जनजागृती

शिरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅली काढण्यात आली. तसेच स्वच्छता अभियान राबवण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनातर्फे प्राचार्य डॉ. डी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. युवा दिनानिमित्त हर घर तिरंगा व एचआयव्हीवर जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय, आयसीटीसी विभागाचे सहकार्य लाभले. रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एम. पाटील व उपप्राचार्य डॉ. आर.डी. जाधव यांच्या हस्ते झाले. रॅलीत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

रॅलीत विद्यार्थ्यांनी भारत माताचा जयघोष केला. उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीटीसी विभागातील समुपदेशक नानाभाऊ बडगुजर, गोपाल वानखेडकर, सतीश माळी, ललिता मराठे, मंगला माळी उपस्थित होते. स्वच्छतेचे महत्त्व लक्षात घेत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या संकल्पनेवर आधारित वेबिनार घेण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे, जीटीपी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. माधव कदम उपस्थित होते. वेबिनारमध्ये ८४हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. प्रा. डॉ. सचिन नांद्रे व प्रा. डॉ. माधव कदम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.राजश्री जाधव यांनी प्रास्ताविक केले. रामकुमार सूर्यवंशी यांनी परिचय करून दिला. प्रा. गोपाल बिडे यांनी आभार मानले. प्रा. डॉ. अनिता मोरे, प्रा. जयश्री दोरिक, प्रा. कविता सिसोदिया, गणेश सोनार, बन्सीलाल चौधरी, अनिस बेग यांनी संयोजन केले.

बातम्या आणखी आहेत...