आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती‎:शिरपूरला कुष्ठरोग विरोधात‎ आरोग्य विभागाची जनजागृती‎

शिरपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदी जनता विद्या प्रसारक संस्थेच्या‎ शिवराम भीमजी अंतुर्लीकर माध्यमिक‎ विद्यालयात कुष्ठरोग जनजागृती अभियान‎ राबवण्यात आले.‎ या वेळी कुष्ठरोगाची माहिती देण्यात‎ आली. तसेच कुष्ठरोगाची लक्षणे व‎ उपचार याविषयी मार्गदर्शन करण्यात‎ आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ विद्यालयाचे मुख्याध्यापक आय. पी.‎ चव्हाण होते. एस. बी. बडगुजर यांनी‎ मार्गदर्शन केले.

मानसी भोईने‎ कुष्ठरोगाविषयीचा संदेश वाचून‎ दाखवला. तसेच जनजागृती फेरी‎ काढण्यात आली. आदर्श नगर, सुभाष‎ कॉलनी, भास्कर बापू कॉलनी, अंबिका‎ नगर, कुंभार टेक, भोई गल्ली परिसरातून‎ ही रॅली निघाली. कुटीर रुग्णालयाचे डॉ.‎ आर. एस. पाटील, मुख्याध्यापक आय.‎ पी. चव्हाण यांनी कुष्ठरोग बाबत सविस्तर‎ माहिती दिली.‎

बातम्या आणखी आहेत...