आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्यसंग्रह:पिंपळनेरचे कवी साहेबराव नंदनांच्या ‘गावगाडा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ; चंद्रकांत बागुल अध्यक्षस्थानी होते

पिंपळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवी साहेबराव नंदन यांच्या खुमासदार शैलीत बोलीभाषेतील गावगाडा काव्य संग्रहाचा २७ मे रोजी नाशिक येथे कवी कुसमाग्रज स्मारक स्वगत हॉलमध्ये समाज बांधव व साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा झाला. या वेळी चंद्रकांत बागुल अध्यक्षस्थानी होते. अॅड. संभाजी पगारे ह्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी कविवर्य ॲड. सोमदत्त मुंजवाडकर, अजय बिरारी, संगीता भामरे, स्वप्ना बोरसे, विलास पंचभाई उपस्थित होते. प्रथमता कवी साहेबराव नंदन व सरला नंदन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रतिमापूजन झाल्यावर मान्यवरांना शाल, गुलाबपुष्प सन्मान पत्र ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वच साहित्यिकांनी समाज बांधवांनी गावगाडावर भाष्य केले. कविता वाचन करून अभिप्राय नोंदवला. प्रास्ताविक प्रा. शांताराम गवळी यांनी केले. प्रा डी. टी. पाटील यांनी गावगाड्याची कुळकथा मांडली. ॲड. संभाजी पगारे यांनी गावगाड्या च्या काव्यसंग्रहातील ओळी वाचून दाखवल्या. त्यातील अस्सल ग्रामीण शब्दांची आठवण देत,ते त्या प्रसंगात घेऊन जात होते, ही कवीची कमाल त्यांनी उल्लेखित केली. अॅड. संभाजी पगारे यांचा जोश, विषयानुरूप भाषण, डी. टी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ज्ञानसिंधू प्रकाशक खोडे यांचे सहकार्य मिळाले. गावगाडा काव्यसंग्रहास सुरेखा आहेर, डॉ. सनान्से यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन कमलाकर घरटे व ज्ञानेश्वर घरटे यांनी केले. ललित कुमार साळवे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...