आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील; विद्यार्थ्यांच्या समर्पण ग्रुपतर्फे दुर्गम आदिवासी भागात आरोग्यावर प्रबोधन

शिरपूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ‘समर्पण’या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संघातर्फे आदिवासी महिला आणि मुलींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि सॅनिटरी पॅडचे वाटप हा उपक्रम राबवण्यात आला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. जे. बी. पाटील यांनी ही माहिती दिली. आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व इतर मानवी मूल्य रुजवण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात.

त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ‘समर्पण’संघाने सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागातील वरझडी, डबक्यापाडा, पारशीपाडा या गावांमध्ये आदिवासी महिला आणि मुलींना मासिक पाळी बद्दल मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविकेच्या मदतीने परिसरातील सर्व मुली आणि महिलांना एकत्रित करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थिनीच्या संघाने सॅनिटरी पॅडचे वाटप केले.

सॅनिटरी नॅपकिन्स कसे वापरायचे आणि त्यांची विल्हेवाट कशी लावायची याची माहिती देण्यात आली. डबक्यापाडा येथेही प्रबोधन केले. फर्शीपाडा येथे मार्गदर्शन केले. हा उपक्रम अधिष्ठाता डॉ. अमृता भंडारी, संचालक डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे, प्रा. सुहास शुक्ल, प्रा. डॉ. नितीन पाटील, प्रा. जी. व्ही. तपकिरे, प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील, प्रा. पी. एल. सरोदे, डॉ. एस. व्ही. देसले, डॉ. आर. बी. वाघ, प्रा. मिल्केश जैन, डॉ. प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

बातम्या आणखी आहेत...