आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वाडी ते निमझरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ असलेला बनावट देशी, विदेशी मद्याच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत १६ लाखांचा मुद्देमाल जप्त झाला. वाडी ते निमझरी रस्त्यावरील एका समाजमंदिराच्या मागील बाजूला बनावट मद्य निर्मितीचा कारखाना असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला. या वेळी महेंद्र भाईदास भील तेथे आढळला. कारवाईत दोन वाहनांसह १६ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.
महेंद्र भील याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने इंद्रसिंग उर्फ पिंटू भील व इतरांचा या व्यवसायात सहभाग असल्याचे सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, उपनिरीक्षक गणेश कुटे, ललित पाटील, लादूराम चौधरी, हेमंत पाटील, मुकेश पावरा, गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रवीण गोसावी, मनोज दाभाडे, कैलास चौधरी, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, प्रशांत पवार, नाना अहिरे, मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी आदींनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.