आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली‎:पर्यावरण जागृतीवर रॅली‎

धुळे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री शिक्षण संस्थेच्या शताब्दी‎ महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई‎ फुले जयंतीचे आैचित्य साधून‎ पर्यावरण, स्वच्छता व आराेग्य‎ रक्षण या विषयावर जनजागृती रॅली‎ काढण्यात आली. त्यात साडेचारशे‎ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.‎ रॅलीची सुरूवात संस्थेच्या माजी‎ विद्यार्थिनी डाॅ. शुभांगी मुंदडा यांनी‎ केली. शाळेपासून रॅली निघून ती‎ गुरूशिष्य स्मारक, टाॅवर बगीचा,‎ शहर पोलिस चाैकी, आग्राराेड,‎ फुलवाला चाैक, जिजामाता‎ हायस्कूल, कमलाबाई कन्या‎ शाळेपर्यंत काढण्यात आली.‎ अध्यक्षा अलका बियाणी यांच्या‎ उपस्थितीत रॅलीचा समाराेप झाला.‎

याप्रसंगी विद्यार्थिनीकडून विविध‎ घाेेषणा दिल्या गेल्यात. रॅलीत‎ शाळेच्या विद्यार्थिनी मेधा‎ कुलकर्णी लिखित वसा पर्यावरण‎ रक्षणाचा व कनिष्ट‎ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रा.‎ क्रांती येवले लिखित रक्तदान‎ विषयावर पथनाट्य सादर करीत‎ जनजागृती केली.

याप्रसंगी संस्थेचे‎ पदाधिकारी, मुख्याध्यापिका,‎ शिक्षक आदी उपस्थित हाेते.‎ रॅलीनंतर डाॅ. शुभांगी मुंदडा यांचे‎ दिवस तुझे हे फुलायचे या‎ विषयावर व्याख्यान जाले. त्यांनी‎ पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी‎ डाॅ.मानसी आशिष पानट यांनीही‎ मार्गदर्शन करण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...