आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजपूजन व वंदन तसेच शोभायात्रेचे आयोजन:शिरपूरला रॅलीतून भारत दर्शन ; स्वातंत्र्याच्या आठवणींना उजाळा

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त किसान विद्याप्रसारक संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी ध्वजपूजन व वंदन तसेच शोभायात्रेचे आयोजन शिरपूर शहरात केले होते.

शिरपूर शहरातील डॉ.व्ही.व्ही.रंधे इंग्लिश मीडियम स्कूल मैदानातून सकाळी १० वाजेला शोभायात्रेला सुरुवात झाली. कृतिकाबेन पटेल यांनी उद्घाटन केले. या वेळी माजी मंत्री आमदार अमरीश पटेल, उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पंतप्रधान आत्मनिर्भर अभियानाचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे, जयश्रीबेन पटेल, प्रवीण दोशी, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशा रंधे, आर. सी. पटेल संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उपविभागीय अधिकारी प्रमोद भामरे, पोलिस उपअधीक्षक दिनेश आहेर, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार पेंढारकर, गटविकास अधिकारी एस.टी.सोनवणे, प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, जिल्हा बँक संचालक सीमाताई रंधे, नगरसेवक रोहीत रंधे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...