आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुण्यात रंगला कापडणेकरांचा कौटुंबिक मेळावा; भूमिपुत्राचा सन्मान, चला कापडण्याला पुस्तकाचे प्रकाशन, अडीचशे कुटुंब हजर

कापडणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणेस्थित कापडणेकरांचा, कौटुंबिक स्नेहमेळावा पुण्यात झाला. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक संजय वाघ, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, उद्योगरत्न पुरस्कारप्राप्त उद्योजक योगेश पाटील आदी भूमिपुत्रांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच ज्येष्ठ साहित्यिका सुमती पवार लिखित, चला कापडण्याला या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही यावेळी झाला. आकुर्डी येथील शहीद अशोक गुलाबराव पाटील नगरमध्ये स्नेह मेळावा झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ जलतज्ज्ञ भिला पाटील होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवान पाटील, जयहिंद संस्थेचे प्रमोद पाटील, नांदेडचे युवा शिवसेना नेते रुद्र हेमंत पाटील, पं.स.सदस्य राजेंद्र पाटील, तंटामुक्त अध्यक्ष नवल पाटील, सरपंच सोनीताई भील, नाशिक मनपाचे माजी स्थायी सभापती बाळासाहेब पाटील, उपसरपंच प्रा.अंकिता पाटील, साहित्यिक सुमती पवार, संजय वाघ, पं.स. सदस्या विनिता पाटील, गाळण सरपंच रूपाली वाणी, सरपंच प्रमोद पाटील उपस्थित होते. जोकर बनला किंगमेकर या पुस्तकास साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लेखक संजय वाघ यांचा सत्कार झाला.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, उद्योजक योगेश पाटील, उद्योजक हिरालाल भामरे यांचाही सन्मान करण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांच्या वतीने, युवा शिवसेना नेते रुद्र हेमंत पाटील यांनी मानपत्र व पुणेरी पगडी स्वीकारले. पत्रकार नारायण बडगुजर, पीतांबर लोहार, रामकृष्ण पाटील यांच्यासह आरोग्यसेवक धनराज पाटील यांचा सन्मान करण्यात आला. या स्नेहमेळाव्यात तत्त्वज्ञान विषयातील सुवर्णपदक विजेता नीलेश माळी, हर्षदा रायभान भामरे, प्रतीक तीर्थराज सैंदाणे-पाटील, वेदिका सतीश भामरे, ललितकुमार जितेंद्र चौधरी, संकल्प प्रवीण भामरे, मधुश्री निखिल वाघ, आशिष गुलाबराव पवार, सिद्धी श्याम माळी, समृद्धी जितेंद्र पाटील, डॉ. संतोष माळी व प्रा. डॉ. अमृता मनोज पाटील यांचा सन्मान झाला.

बातम्या आणखी आहेत...