आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा:महापालिकेच्या बायोगॅस प्रकल्पासाठी फेरनिविदा

धुळे2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. याकरिता निविदा प्रक्रिया केली. त्यात ४ निविदा प्राप्त झाल्यावर कागदपत्राच्या अपूर्णतेमुळे त्या अपात्र ठरल्याने आता फेरनिविदा काढण्यात येणार आहे.

शहरात महापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात शहरातील कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी कचरा संकलनाचा कंत्राट देण्यात आला आहे. त्यात ओला व कोरडा कचरा वेगवेगळा संकलित करावयाचा आहे. त्यानंतर हा कचरा डेपोवर याचे वर्गीकरणाप्रमाणे त्याची विल्हेवाट लावण्यात येते. यात ओला कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आता या ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यात शहरात घराघरातून शिळे अन्न, हॉटेल, मंगल कार्यालय, खाद्य पदार्थ स्टॉल यांच्याकडील उरलेले अन्नातून बायोगॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. याकरिता निविदा प्रक्रिया करून एका संस्थेलाच हा पूर्ण प्रकल्प उभारणे, त्यातून गॅस निर्मिती व वितरण करणे काम राहणार आहे. यामुळे ओल्या कचऱ्याची पूर्णपणे विल्हेवाट लागणार आहे. त्याचप्रमाणे बायोगॅसच्या माध्यमातून मनपाला उत्पन्नही प्राप्त होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...