आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अद्ययावत माहितीसाठी वृत्तपत्र वाचा; शहाद्यातील स्पर्धा परीक्षा शिबिरात प्रा.डॉ.काठोळेंचा सल्ला

शहादा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वच विषयांच्या अभ्यास तपशीलवार व निरीक्षणपूर्वक आवश्यक असते. अभ्यासक्रम व त्या बाहेरील प्रश्न समजून घेत त्यांची योग्य उत्तरे शोधावी लागतात. स्थानिक ते जागतिक पातळीवरील चालू घडामोडींबाबत अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन नियमितपणे करावे. मिळालेल्या माहितीचे पृथक्करण करावे व नोंदी ठेवाव्यात. यासाठी वर्तमानपत्र वाचनाची सवय असावी, असा सल्ला अमरावती येथील आयएएस अकॅडमीचे प्रमुख संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी येथे दिला.

येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयातील पुष्पकमल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात केले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ. काठोळे बोलत होते. पुष्पकमल स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. हे व्याख्यान त्याचाच एक भाग हाेते. महाविद्यालयाच्या सभागृहात “शेतकऱ्यांची मुले होणार आयएएस’ या विषयावर प्रा.डॉ. काठोळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलाखत कशी द्यावी याविषयी प्रा.डॉ. काठोळे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे समाधान केले.

कार्यक्रमास जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक अमोल शिंदे, दिलीप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल, केंद्राचे प्रमुख प्रा.राकेश कापगते यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमल पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा.पंकज पेंढारकर यांनी केले. प्रा.प्रशांत चंदिले, प्रा.दिलीप सूर्यवंशी, प्रा.संदीप पाटील, प्रा.मुकेश कोळी आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...