आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाने १ एप्रिलपासून रेडी रेकनर (बाजारमूल्य दरतक्ता) दर जाहीर केले आहे. त्यानुसार धुळ्याचे दर ८.९८ टक्के वाढवण्यात आले आहे. पुणे, कल्याण, डोंबिवली, जळगाव, अहमदनगरपेक्षा हे दर अधिक आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसेल. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर खरेदीचे स्वप्न महागणार आहे. रेडी रेकनरचा दर निश्चित करताना समतोल साधण्याची गरज होती.
मागील दोन वर्षांपासून स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मंदीचा विचार करून सन २०१८-१९ व २०१९-२० साठीचे ते दर पूर्वीप्रमाणे होते. कोरोनामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आहे. त्यात युद्ध व इतर घडामोडींमुळे बांधकाम साहित्याचे दर वाढले. त्यामुळे घरांच्या किमती वाढल्या असून, त्या पुन्हा वाढतील.
स्टॅम्प ड्यूटीची रक्कम आता ९ टक्के द्यावी लागणार असल्याने बसेल भुर्दंड
घर खरेदी करताना त्यावर भराव्या लागणाऱ्या स्टॅम्प ड्यूटीची रक्कम आता ९ टक्के द्यावी लागणार आहे. यापूर्वी २० लाख रुपयांसाठी ६ टक्के स्टॅम्प ड्यूटी भरावी लागत होती. त्यात आता ९ टक्के वाढ झाल्याने २० लाखांऐवजी २० लाख ३६ हजार रुपयांवर स्टॅम्प ड्यूटी भरावी लागेल.
डोंबिवलीत ७.४२, जळगावला ७.४१, पुण्यात ६.१२, नगरला ७.७२ टक्के
धुळ्याच्या दरात ८.९८ टक्के इतकी वाढ झाली आहे. दुसरीकडे कल्याण डोंबिवली ७.४२, पुणे ६.१२, सोलापूर ८.०८, जळगाव ७.४१, अहमदनगर ७.७२ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही शहरे विकसित असताना त्याठिकाणी कमी वाढ करून धुळ्यासाठी तब्बल नऊ टक्के वाढ केली आहे.
किमती वाढण्याची शक्यता
रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्याने शहरातील जागेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. शहरची हद्दवाढ झाली असली तरी मनपा हद्दीतील गावातील जमिनीच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात होत्या. मात्र, रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्याने तेथील जागेच्या किमतीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घराच्या किमतीत पुन्हा होईल वाढ
बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे घरांच्या किमतीत १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. आता रेडी रेकनरचे दर वाढले आहेत. शहरात काही भागात रेडी रेकनरपेक्षा कमी दर आहे. तर काही भागात अधिक आहे. रेडी रेकनरच्या दरवाढीमुळे घराच्या किमतीत दोन ते पाच टक्के वाढ होऊ शकते. -दीपक अहिरे, अध्यक्ष बिल्डर्स असोसिएशन.
निर्णयाची अंमलबजावणी झाली सुरू
सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नवीन दराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागेच्या किमतीत रेडी रेकनरच्या दरामुळे वाढ होऊ शकते. मात्र त्यावरील स्टॅम्प ड्यूटी कायम राहणार आहे. त्यामुळे रेडी रेकनरच्या दरानुसार वाढणाऱ्या वाढीव रकमेवर स्टॅम्प ड्यूटी अधिक लागेल. -सुनील पाटील, जिल्हा मुद्रांक अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.