आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी जर सरकारी नोकरीच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल विभाग आता नव्या वर्षात ९८ हजार ८३ जागा भरणार आहे. २४ ते ३० डिसेंबरदरम्यान त्यांनी रोजगार सप्ताह घेतला. त्यात ९८,०८३ रिक्त जागा असल्याचे निदर्शनास आले. नव्या वर्षात सविस्तर अधिसूचना जारी केली जाईल.
त्या वेळी अर्ज करण्याची मुदत, वेतनश्रेणी, लेखी आणि तोंडी परीक्षेसह निवड झालेल्या पात्र उमेदवारांचा रुजू दिनांक निश्चित केला जाणार आहे. रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर डिसेंबरमध्ये जारी केला आहे. जे विद्यार्थी दहावी आणि बारावी उत्तीर्ण आहेत त्यांना केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. पोस्टमनच्या सर्वाधिक ५९,०९९ जागा भरण्यात येतील.
मल्टिटास्किंग स्टाफ म्हणजेच एमटीएसच्या ३७,५३९ जागा आहेत. मेल गार्डच्या १४४५ जागा याच प्रक्रियेत भरण्यात येतील. टपाल विभागाने ९८ हजार ८३ जागांचे मॅपिंग केले आहे. जानेवारी, फेब्रुवारी २०२३ मध्ये अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.