आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐंशी फुटी रस्त्यावर अतिक्रमण काढा:वलवाडीत कर ३० टक्के कमी करा; खासदार डॉ. सुभाष भामरेंची सूचना

धुळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वलवाडी परिसरातील मालमत्ता धारकांच्या करात वाढ झाली आहे. त्याविरोधात अनेक नागरिकांनी हरकती नोंदवल्या. महापालिका प्रशासनाने विनाकारण कर वाढ करू नये, या भागातील नागरिकांना दिलेली मालमत्ता कराचे बिल २० ते ३० टक्के कमी करावे, ऐंशी फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, अशी सूचना खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली.

महापालिकेत मंगळवारी बैठक झाली. त्या वेळी ते बोलत हाेते. या वेळी महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, उपमहापौर अनिल नागमोते, आयुक्त देविदास टेकाळे, सभागृह नेते राजेश पवार, माजी महापौर चंद्रकांत सोनार, उपायुक्त संगीता नांदुरकर, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, नगरसेवक नागसेन बोरसे, वंदना भामरे, नरेश चौधरी आदी उपस्थित होते. वलवाडी भागातील नागरिकांना जास्त कर लावला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून, कर कमी करावा, अशी मागणी नगरसेविका वंदना भामरे, नरेश चौधरी यांनी केली. त्यावर खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले की, हद्दवाढीच्या क्षेत्रात पुरेशा प्रमाणात सुविधा नाही. या भागात विकास काम करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करू नये असेही ते म्हणाले. भाजपचे महानगराध्यक्ष अनूप अग्रवाल यांनी चर्चेत सहभाग नोंदवला.

गुन्हे दाखल करा
खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी एेंशी फुटी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची सूचना केली. नटराज सिनेमागृहासमोरील मनपाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी सूचना त्यांनी केली.

बैठकीत आमदारांचा फोन
महापालिकेत बैठक सुरू असताना अनूप अग्रवाल यांना आमदार फारुख शाह यांचा फोन आला. त्यांनी अतिक्रमणाविषयी विचारणा केली. या वेळी अनूप अग्रवाल यांनी अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...