आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:मजीप्राचा नकार; बांधकाम विभागातर्फे रस्त्याचे काम

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील देवपूर परिसरात भूमिगत गटारीचे काम करण्यासाठी रस्ते खोदण्यात आल्यावर त्यांची दुरुस्ती झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे हे काम झाले. त्यानंतर अल्पावधीत आग्रारोडची दुरवस्था झाली. या रस्त्यावर आयटीआय समोर सर्वाधिक खड्डे पडले. या रस्त्यावर असलेल्या चेंबरचे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने मजीप्राला केली होती. पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे काम ठेेकेदाराने यापूर्वीच केल्याचे स्पष्ट करत पुन्हा काम करण्यास नकार दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आता रस्त्याची दुरुस्ती केली जाते आहे.

आग्रारोड हा शहरातील प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर सकाळी सात वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत वर्दळ असते. नवरंग जलकुंभापासून नगावबारी चौफुलीपर्यंत मजीप्राने भूमिगत गटारीच्या पाइपलाइनसाठी हा रस्ता खोदला होता. त्यानंतर त्या रस्त्याची डागडुजीही केली. पण अल्पावधीत रस्त्याची दुरवस्था झाली. आयटीआय समोर ठिकठिकाणी खड्डे पडले. गटारीचे चंेबरही फुटले. त्यामुळे रस्त्याचे काम करण्यापूर्वी चेंबरचे काम करण्यासाठी मजीप्राला सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र दिले होते.

त्यावर मजीप्राने बांधकाम विभागाला पुन्हा पत्र दिले. कंत्राटदाराने रस्त्याचे काम केल्याचे या पत्रात नमूद हाेते. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंगळवारपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आयटीआयसमोर तसेच देवपूर बसस्थानकासमोर रस्ता दोन्ही बाजूने खोदण्यात आला आहे. काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त झाले.

मनपाला द्यावे लागतील ५ कोटी
शहरातील प्रमुख २० रस्त्यांचे काम करण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर आहे. या निधीतून काही रस्त्यांचे काम झाले. काही रस्त्यांचे दुसऱ्या टप्प्यातील काम थांबले आहे. या कामासाठी महापालिकेने त्यांचा हिस्सा जमा केल्यावर शासन निधी देणार आहे. मनपाने आतापर्यंत १३ कोटी रुपये दिले असून अद्यापही ५ कोटी जमा केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...