आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत माथाडी कामगार म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, असे साकडे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना महिला माथाडी कामगारांकडून घालण्यात आले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. माथाडी महिला कामगारांनी प्रथम माजी आमदार अनिल गाेटे यांची राष्ट्रवादी भवनात भेट घेतली. त्यांचे पत्र घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या दाेन वर्षांपासून त्यांच्यावर उपासमारी आहे, अशी माहिती यात नमूद करण्यात आली आहे.
महिलांना काम नसल्याने येणाऱ्या अडचणीबाबतही उल्लेख करण्यात आला हाेता. अनिल गाेटे यांच्या पत्रासह देण्यात आलेल्या निवेदनानंतर कामगार बाेर्डाच्या नियमावलीनुसार याेग्य ती कारवाई केली जाईल. तसेच त्याबाबत असलेल्या नियमावलीची माहिती देण्यात आली. याबबत गाेटे यांच्याशी चर्चा करून याेग्य मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून महिला माथाडी कामगारांना देण्यात आले. याप्रसंगी ३० ते ४० महिला उपस्थित हाेते. निवेदन देताना राष्ट्रवादीच्या सुरेखा नांद्रे, गायत्री साळवे, पद्माबाई चव्हाण, संगीता शिरोदे, सिंधुबाई शिंदे, सीताबाई महानोर, मंगलाबाई सोनार, नर्मदाबाई धायगुडे, कमलाबाई मोरे, गोदाबाई थोरात, शेवंताबाई देसले, सरलाबाई तमखाने, केवल बाई महाले, विमलबाई मराठे, सुंदराबाई देवकाते, विमलबाई बोरकर आदी व बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या, अशी माहिती गायत्री साळवे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.