आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसावेळी शिंदखेडा तालुक्यातील वरझडी येथील शेतकरी चिंधा पंडित माळी यांची बैलजोडी वीज पडून ठार झाली होती. या पार्श्वभूमीवर माळी यांना ५० हजार रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कामराज निकम, जिल्हा परिषद सदस्य देविदास बोरसे, माजी जिल्हा परिषद सदस्य हिरामण बैसाणे, माजी बांधकाम समिती सभापती जितेंद्र गिरासे, मंडळाधिकारी परमेश्वर धनगर, तलाठी पंकज अहिरराव आदी उपस्थित होते. गेल्या आठवड्यात शिंदखेडा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.