आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेर धरणाच्या तालुक्यातील मांजरोद येथील पाटचारी दहा व बारामध्ये आवर्तन सोडण्यात आले. आमदार आमदार अमरीश पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेश पटेल यांच्या प्रयत्नाने आवर्तन सोडण्यात आले. पाटचारीत आवर्तन सोडल्यानंतर आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेश पटेल यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या वेळी आमदार काशिराम पावरा म्हणाले की, शेती व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून पाटचारीमध्ये आवर्तन सोडण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे भले कसे होईल यासाठी पटेल परिवार नेहमीच काम करत आहे. तालुक्यात शिरपूर पॅटर्नअंतर्गत ३२८ पेक्षा जास्त बंधारे बांधण्यात आले असल्याचे ते म्हणाले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी पी.बी. पाटील, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, संचालक अविनाश पाटील, मांजरोदचे सरपंच भुलेश्वर पाटील, गोपाल पाटील, रितेश पाटील, संजय राजपूत, मोतीलाल पाटील, स्वप्निल पाटील, महेश पाटील, कांतिलाल पाटील, सुनील पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल पाटील, विजय जोशी, एकनाथ राजपूत, सत्यजित चौधरी, रमेश पाटील, भाटपुराचे उपसरपंच रोशन सोनवणे, संजय महाजन, युवराज चौधरी, संजय वाघ, कल्पेश शिरसाठ, सुधाकर पाटील, शिरपूर पॅटर्नचे प्रकल्प संचालक टी. आर. दोरिक आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.