आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण दिन:रस्ते अपघातात जीव‎ गमावलेल्यांचे स्मरण‎

धुळे‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे‎ रस्ते अपघातात जीव गमावलेल्या‎ व्यक्तीच्या स्मरणार्थ चाळीसगाव‎ चाैफुली येथे रविवारी स्मरण दिन‎ पाळण्यात आला.‎ प्रादेशिक परिवहन अधिकारी‎ स्टीव्हन अल्वारिस, सहायक‎ प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल‎ कदम, चारुदत्त व्यवहारे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली मोटार वाहन‎ निरीक्षक मिलिंद खानोरे, सहायक‎ मोटारवाहन निरीक्षक मुकेश माळी,‎ अमोल मालुंजकर, विनोद हिरे,‎ मनीष देवरे, अमोल शेलार, गणेश‎ पाटील, कुणाल पाटील उपस्थित‎ होते.

दरवर्षी २० नोव्हेंबरला रस्ते‎ अपघातात जीव गमावलेल्या‎ व्यक्तींचे स्मरण केले जाते.‎ त्यानुसार मृत्युमुखी पडलेल्यांना‎ श्रध्दांजली अर्पण केली. तसेच‎ नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची‎ माहिती दिली. तसेच दुचाकी‎ चालकांना हेल्मेट वाटप करण्यात‎ आले.

बातम्या आणखी आहेत...