आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:वाहतुकीला अडथळा ठरणारा चबुतरा हटवला; सामाजिक संस्थांची तक्रार

धुळे9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील दत्त मंदिर चौकात दत्त मंदिराच्या समोर रस्त्यावरील दुभाजकात आमदार निधीतून स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी तयार करण्यात आलेला चबुतरा थेट रस्त्यावर येत होता. त्यामुळे अपघाताचा धोका होता. याविषयी ‘दिव्य मराठी’ने सविस्तर वृत्त दिले होते. तसेच या सामाजिक संस्थांनीही तक्रार केली होती. त्यामुळे अखेर महापालिका प्रशासनाने अडथळा ठरणारा चबुतरा तोडला आहे. तो आता कमी केला जाणार आहे.

दत्त मंदिर चौकात आमदार निधीतून गाय-वासराचे स्मारक साकारण्यात येत आहे. हे स्मारक तयार करण्यासाठी दुभाजक फोडून चबुतरा उभारण्यात आला आहे. हा चबुतरा दुभाजकापासून पूर्वेकडे दीड फूट आणि पश्चिमेकडे सव्वाफूट रस्त्यावर आला होता. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला होता. चबुतऱ्याचे काम सुरू असताना लहान अपघात झाले होते. ही बाब ‘दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सामाजिक संस्थांनी तक्रार केली. त्यानंतर मनपाने चबुतऱ्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला. तसेच चबुतरा तोडला. आता लहान स्वरूपात चबुतरा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...