आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्यक विभागातर्फे राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत मानधन याेजना राबवली जाते. या योजनेचा जिल्ह्यातील ३७२ जण लाभ घेता आहे. याेजनेच्या मानधनात दुप्पट वाढ झाली असल्याची माहिती ज्येष्ठ कलावंत मानधन याेजना जिल्हा समितीचे अध्यक्ष पारिजात चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी समितीचे उपाध्यक्ष श्रावण वाणी, सदस्य जगदीश देवपूरकर, पपीता यादवराव जाेशी अादी उपस्थित हाेते. पारिजात चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील वृद्ध साहित्यिक, कलावंतांना मानधन देण्याची योजना सन १९५४-५५ पासून सुरू अाहे. प्रत्येक जिल्ह्यातून शंभर कलावंत, साहित्यिकांची मानधनासाठी निवड हाेते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कलावंताचे वय ५० वर्षापेक्षा जास्त असावे. तसेच कलावंताचे महाराष्ट्रात २५ वर्षापेक्षा अधिक वास्तव्य असावे. वार्षिक उत्पन्न ४८ हजाराच्या अात असणे आवश्यक आहे. काेविडमुळे सन २०१९ ते २०२२ या काळातील एकूण ७५९ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत अाहे. त्यातून ३०० प्रस्ताव मंजूर करण्यात येतील.
याेजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात जमा करावे. अर्ज भरण्यासाठी शुल्क लागत नाही. अर्ज करणाऱ्यांना त्यांची कला समितीसमाेर सादर करावी लागते, असेही त्यांनी सांगितले.
असे मिळेल मानधन
मानधनात आता वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर याेगदान देणारे साहित्यिक,कलाव ंतांना पूर्वी दरमहा १ हजार ४०० रूपये मानधन मिळत हाेते. ते आता २ हजार ७५० रूपये रूपये मिळते. राज्य पातळीवर योगदान देणाऱ्या कलावंतांना पूर्वी १ हजार २०० मानधन मिळत होते. आता २ हजार ५५० रूपये मिळतील. तसेच जिल्हास्तरावर याेगदान देणाऱ्या कलावंतांना १ हजाराएेवजी २ हजार २५० रूपये मानधन मिळेल, अशी माहिती श्रावण वाणी यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.