आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:तळोदा तालुका क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून त्याचे हस्तांतरण करा; बिरसा मुंडा स्पोर्ट‌्स अकॅडमीची मागणी

तळोदा16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या व गेल्या पाच वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या तळोदा तालुका क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून ते बिरसा मुंडा स्पोर्ट््स अकॅडमीला देण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे केली आहे.

येथील क्रीडा संकुल सध्या बंद अवस्थेत असल्याने त्याची रंगरंगोटी, विजेच्या दिव्यांची दुरुस्ती तसेच आतील-बाहेरील व अन्य दुरुस्ती करून ते बिरसा मुंडा स्पोर्ट््स अकॅडमीला वापरण्यासाठी द्यावे. जेणेकरून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा काैशल्यास वाव मिळेल व विद्यार्थ्यांना विविध खेळांचे सराव करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे क्रीडा संकुल सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊन संकुलाची इमारत व क्रीडांगण परिसर सुस्थितीत राखण्यासही मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्याच्या प्रती जि.प. अध्यक्ष, पालिका मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनाही दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...