आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध पातळीवर काम पूर्ण:शहाद्यात मुख्य जलवाहिनी दुरुस्ती; पुरवठा सुरळीत

शहादा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एचडीएफसी बँक ते प्रकाशा रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नगरपालिका प्रशासनातर्फे दिनांक ११ नोव्हेंबर रोजी युद्ध पातळीवर पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून उशिरा सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

विजय नगर परिसरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे अर्थात मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांच्याकडे पाइपलाइनला गळती असल्याची वेळोवेळी तक्रार केली होती. नंतर मात्र जास्तच गळती सुरू झाल्याने शिवाय मुख्य पाइपलाइन असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने तातडीने ११ नोव्हेंबर रोजी सकाळपासून जेसीपी यंत्र लावून पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. सारंगखेडा तालुका शहादा येथून तापी नदीच्या पात्रातून शहादा शहरापर्यंत कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन जोडली आहे. मुख्य जलवाहिनी शहराच्या काही भागातून गेलेली आहे. विजयनगर जवळ ही पाइपलाइन दुरुस्त करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी मेहनत घेत होते. उशिरा सायंकाळपर्यंत काम पूर्ण झाले.

बातम्या आणखी आहेत...