आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याख्यान:शिवाजीनगरातील रहिवाशांनी साजरा केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव

धुळे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री येथील शिवाजीनगर नं. २ च्या रहिवाशांनी पर्यावरणपूरक गणेशाेत्सव साजरा केला. यासंदर्भात रहिवाशींनी बैठक घेऊन पर्यावरणपूरक व वैचारिक प्रबाेधन हाेईल, अशा पद्धतीने गणेशाेत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शाडू मातीची लहान मूर्तीची स्थापना करण्यात आली. मनाेहर भदाणे यांनी पाैराेहित्य केले. दुसऱ्या दिवशी सुभाष माेहिते यांचे माॅ जिजाऊ एक प्रेरणास्राेत विषयावर, तिसऱ्या दिवशी विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा. एल.जी. साेनवणे यांचे मीच माझ्या जीवनाचा रक्षणकार यावर व्याख्यान झाले.

तसेच सेवानिवृत्त नागरिकांसह विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाचव्या दिवशी महाप्रसाद वाटप केले गेले. तसेच गणेश विसर्जन नदीत न करता काॅलनीतील परिसरात बॅरलमध्ये पाणी भरून करण्यात आले.

यासाठी साक्री तालुका निसर्गमित्र समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य बी. एम. भामरे, पर्यवेक्षक प्रा.डी.पी. पाटील, नगरसेविका तथा आराेग्य सभापती मनीषा देसले यांनी यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेतासठी अध्यक्ष मुख्याध्यापक एन. आर. नांद्रे, सचिव प्रा. संदीप देवरे, उपाध्यक्ष उपप्रचाार्य अनंत पाटील व सर्व नगरवासीयांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...