आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम सज्ज:गावातील रहिवासी नसलेल्या आमदारांचे ठराव ; जिल्हा दूध संघातील हरकतींवर सुनावणी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी गावातील रहिवासी नसतानाही अनेक आमदारांनी तेथील रहिवासी दाखवून स्वत:च्या नावे दूध संस्थाचे ठराव केले आहेत. या ठरावांवर हरकती घेण्यात आल्या असून हे ठराव कळीचा मुद्दा ठरले आहेत. दसऱ्यानंतर या हरकतींवर सुनावणी हाेणार असून, त्यासाठी आमदारांनी आपल्या कायदेतज्ज्ञांची टीम सज्ज केली आहे.

सहकार विभागाने दूध संघाच्या प्रारूप यादीवर हरकती मागवल्या हाेत्या. त्यात अनेक आमदारांनी ज्या गावांचे रहिवासी नाहीत अशा गावांमधील दूध साेसायटीमध्ये स्वत:च्या नावे ठराव केले आहेत. यात आमदारांसाेबत कार्यकर्ते, पदाधिकारीदेखील आहेत. यांच्या ठरावावर हरकती घेण्यात आल्या आहेत; एकूण २३ हरकतींवर सुनावणी सुरू असून, ६ ऑक्टाेबरनंतर पुन्हा सुनावणी सुरू हाेणार आहे. त्यामुळे या हरकतींवर बाजू मांडण्यासाठी आमदारांकडून कायदेतज्ज्ञांची फाैज सज्ज आहे. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार किशाेर पाटील, आमदार मंगेश चव्हाण, महापाैर जयश्री महाजन, माजी आमदार डाॅ.सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार स्मिता वाघ आदींचे ठराव आहेत.

बातम्या आणखी आहेत...