आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन:सणांचा उद्देश युवकांपर्यंत पोहोचल्यास आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर वाढेल

धुळे2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी जलज शर्मांचे शांतता समिती बैठकीत प्रतिपादन

प्रत्येक धर्मात साजरा होणाऱ्या सण, उत्सवामागे काहीतरी परंपरा असते. त्याबद्दलची माहिती आजच्या युवकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या सण, उत्सवाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यातून युवकांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दलचा आदर वाढेल, असे मत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात दुपारी होळी, धूलिवंदन, शिवजयंती, शब-ए-बरातच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. बैठकीत व्यासपीठावर महापौर प्रदीप कर्पे, पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप महिराळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी बैठकीत उपस्थितीत विविध राजकीय, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना या सण,उत्सवाबाबत सूचना मांडण्याची संधी बैठकीत दिली गेली. त्यानुसार राज चव्हाण, शव्वाल अन्सारी यांच्याकडून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या क्लिप, संदेशाबाबत खबरदारी घ्यावी अशी सूचना केली. तर अॅड.प्रसाद देशमुख यांनी वेळेच्या मर्यादेत सूट देण्याची विनंती केली. उमेश चौधरी, महाजन, वंचित आघाडीचे अरविंद निकम, सरफरोज अन्सारी यांच्याकडून यासंदर्भातील मते मांडून काही सूचना करण्यात आल्या. त्यात रंग, पाणी कोणाच्याही अंगावर जबरदस्तीने फेकू नये, मंडळाशिवाय अन्य कोणालाही अनोळखीला होळी खेळण्यासाठी परवानगी देऊ नये अशा सूचना केल्या. तर अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी या सणाबाबत शासनाकडून आलेल्या सूचनांची माहिती देत त्याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक नितीन देशमुख तर आभारप्रदर्शन डीवायएसपी प्रदीप महिराळे यांनी केले.

याप्रसंगी शहरातील पोलिस ठाण्याचे अधिकारी, माजी सभापती युवराज पाटील, नगरसेवक हिरामण गवळी, अमीन पटेल, संजय शर्मा, भिकूबाई मोरे, कल्पेश थोरात यांच्यासह इतर विविध धर्मीय नागरिकांची उपस्थिती होती. पोलिस प्रशासनाला सर्व सहकार्य केले जाईल. पोलिसांनीही भावना, उत्साह लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महापौर प्रदीप कर्पे यांनी केले.

दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या
पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी कोणतीही गोष्ट मर्यादेत केली तरच तिचा आनंद मिळतो. सण, उत्सव साजरे करताना परिसरातील वयोवृद्ध, विद्यार्थी, रुग्णांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली गेलीच पाहिजे. आपल्या आनंदामुळे त्यांना त्रास होणार नाही हे विसरून चालणार नाही. तसेच कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून चुकीचा संदेश जाणार नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. अन्यथा त्यांच्याविरुद्ध पोलिसांकडून कारवाई तर सुरूच असल्याचे स्पष्ट केले. पोलिस अधिकाऱ्यांनाही अवैध दारूसंदर्भात मोठ्या कारवाईच्या सूचना बैठकीत त्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...