आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:हिरे वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिराला प्रतिसाद

धुळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक रक्तदाता दिनानिमित्त येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान शिबिर झाले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे अध्यक्षस्थानी होते. उपअधिष्ठाता डॉ. अभय सुभेदार, डॉ. वसईकर डॉ. रानडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकर्रम खान, रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. सुनील चव्हाण प्रमुख पाहुणे होते.

अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी उपस्थितांना रक्तदानाविषयी माहिती दिली. रक्तदान शिबिराचे आयोजक संत निरंकारी मंडळाचे हिरालाल पाटील, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आनंद सैंदाणे, आर. एम. केमिकल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिको असोसिएशन, दीपरक्त सेवा ग्रुप, विवेकानंद बहुद्देशीय धर्मदाय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राजपूत, मनोहर पाटील, अनिल अहिरे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रांगोळी स्पर्धेतील विजेते डिंपल सदाशिव जाधव, दामिनी किशोर मोरे, पन्नासपेक्षा अधिक वेळा रक्तदान करणारे नीलेश सुराणा, संदीप कुलकर्णी, हेमंत पटेल, संजय शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजश्री दामले, डॉ. धीरज निकुंभ, डॉ. दीपक शेजवळ, प्रशासकीय अधिकारी कुमावत आदी उपस्थित होते. डॉ. दीपक शेजवळ यांनी सूत्रसंचालन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. किर्ती रुईकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ निलेश सुराणा आदींनी प्रयत्न केले.