आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या सेवकांच्या ३७ व्या दोन दिवसीय शैक्षणिक शिबिरास ४ मेपासून कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई.स्कूलच्या प्रांगणात सुरुवात झाली. शिबिराच्या अध्यक्षस्थानी धुळे जि.प.अध्यक्ष तथा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे होते. शिबिराचे उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या हस्ते झाले.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे, प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल रंधे, धुळे मध्यवर्ती बँकेच्या संचालक प्रभाकर चव्हाण, बँकेच्या संचालिका सिमा रंधे,विश्वस्त रोहित रंधे, ग.स.बँकेचे संचालक शशांक रंधे, प्राचार्या सारीका रंधे, विश्वस्त हर्षाली रंधे,विद्या रंधे,रोहीणी रंधे,शामकांत पाटील,संजय गुजर,व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे सचिव निशांत रंधे यांनी केले. तर दि.५ मे रोजी शिक्षणमहर्षी कर्मवीर व्यंकटराव रणधीर यांच्या जयंतीनिमित्ताने बोराडी येथील स्मृतीस्थळावर सकाळी ७.३० वाजता आदरांजली कार्यक्रम होणार आहे. सूत्रसंचालन संदीप चौधरी व निजामोदीन शहा यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.