आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश:पटेल कन्या विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेला प्रतिसाद

तऱ्हाडी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील वरूळ येथील एच.आर. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभागातर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा झाली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

प्रा. बी. एन. पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. दोन गटात वक्तृत्व स्पर्धा झाली. पाचवी ते आठवीच्या गटातून भावना भगवान पाटील, रुचिता प्रफुल्ल पाटील, नववी ते बारावीच्या गटातून तन्वी संजय पाटील, मनीषा अर्जुन कोळी, ममता धर्मेंद्र ईशी, उज्ज्वला रवींद्र कोळी यांनी यश मिळवले. प्राचार्य एस.एन. जोशी यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनकार्याची माहिती दिली. राकेश मोरे यांनी आझादी का अमृत महोत्सवाची माहिती दिली. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण वाय.डी. पाटील व एम. बी. पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...