आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:शहाद्यात लाडकोरबाई विद्यालयात शाळा पूर्वतयारी कार्यक्रमास प्रतिसाद

शहादा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील लक्ष्मीनारायण ट्रस्ट संचालित लाडकोरबाई विद्यालयात शाळापूर्व तयारी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे शाखा चेअरमन अॅड.राजेश कुलकर्णी होते.

याप्रसंगी मुख्याध्यापिका माया जोहरी, विद्यालयातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमास पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विभागामार्फत शाळापूर्व तयारी हा उपक्रम राबवला जात आहे. त्या माध्यमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये सातत्य निर्माण व्हावे, यासाठी त्यांना प्रवेश संदर्भात मार्गदर्शन करून पुढील वर्गासाठी त्याचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या जातात.

पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची खेळणी देण्यात आली. पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शाखा चेअरमन अॅड.कुलकर्णी यांनी, शिक्षक व पालक ही दोन महत्त्वाची चाके असून विद्यार्थ्यांत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करावा. शिक्षणावर भर द्यावा, असे सांगून शुभेच्छा दिल्या. सामाजिक, भावनिक, शारीरिक, भाषा विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...