आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:बारावीच्या 24 हजार विद्यार्थ्यांचा आज निकाल ; पेपर लिहिण्याची वेळ वाढवली

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण मंडळातर्फे ४ मार्च ते २४ एप्रिल दरम्यान झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी ऑनलाइन जाहीर होईल. जिल्ह्यातील २४ हजार ८६८ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. यंदा प्रथमच प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र होते. तसेच पेपर लिहिण्याची वेळ वाढवली होती. कोरोनामुळे गेल्या वर्षी बारावीची परीक्षा झाली नव्हती. अतंर्गत व बाह्य मूल्याकंनाच्या आधारे निकाल जाहीर झाला होता. कोरोना फैलाव कमी झाल्याने यंदा परीक्षा झाली. जिल्ह्यात १९९ परीक्षा केंद्रात २४ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर आता शिक्षण मंडळातर्फे उद्या बुधवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होईल. १७ जूनला कनिष्ठ महाविद्यालयात गुणपत्रक मिळेल. पुनर्मूल्यांकनाची संधी विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यानुसार गुणपडताळणीसाठी १० ते २० जून दरम्यान, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी १० ते २९ जून दरम्यान अर्ज करता येईल.

बातम्या आणखी आहेत...